पान:तुतीपासून रेशीम.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ पिकल्यास त्यांनी घातलेले कोसले चिकव्याचे असतात. अशा समयीं किडे चंदरकींत टाकल्याबरोबर त्या चंदर क्या हवा बंद करतां येईल अशा कोठडींत ठेवून त्यांत चुन्याच्या पेट्यांची दारे उघडी ठेवावीत. चुन्याच्या कळ्यांच्या नैसर्गिक गुणानें घरांतील ओलावा शोषून आंतील हवा रुक्ष बनते. व अशा मुक्या हवेंत चिकट्याचे कोसले होत नाहींत. रेशमाच्या किड्यांचे शत्रु. रेशमाचे किड्यांस अनेक शत्रु आहेत व त्यांस अनेक रोगांचें भयही असतें. किडे रोगांचे तडाक्यांतून वांचल्यास सर्व पीक पदरांत पडलें, असें नाहीं. माझ्या, मुंग्या, पाली, कोळी, झुरळें, उंदीर, मांजरें, डांस, वगैरे अनेक शत्रु या किड्यांस आहेत. या किड्यांची जात अगदीं निरुपद्रवी आहे. जेथें रेशमाचा धंदा करितात, ह्मणजे जेथें रेशमाचे किडे पाळले जातात, तेथें माश्यांपासून या किड्यांस अतिशय जपलें पाहिजे; नव्हे, सर्व शत्रूंपासून जपलें पाहिजे. माझ्या घरांत येऊ नयेत, ह्मणून किडे पाळावयाचे खोलीचे खिडक्यांस व गवा- क्षद्वारांस जाळीचा पत्रा अथवा तारेची जाळी कायमची लाव- लेली असावी. किडे पाळावयाचे घरांत कोळी, झुरळें, मांजरें, उंदीर, वगैरे जाऊं देऊ नयेत, अशी व्यवस्था असावी. कदा- चित् नजर चुकवून कोळी, झुरळें, पाली, वगैरे घरांत गेल्यास त्यांस चौखुरावर चढून किड्यांचे जवळ जातां येऊ नये,