पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२५ करितां घेऊं नयेत. जर अशा फुलपाखरांपासून अंडी घेतलीं, तर त्यांचे संततीत शेकडा पंचवीस ते पन्नास पावेतों जोड कोसल्यांचे प्रमाण पडतें. जोड कोसल्यांची सलंग तार निवूं शकत नाहीं. व त्याची किंमत अवांतर कोसल्यां- पेक्षां एक तिसांश कमी येते. ह्मणून प्रत्येकानें बीजाकरितां कोसले निवडतांना असले कोसले निवडीत जाऊ नये. चिकटा:-ज्या वेळीं हवा अतिशय ओलसर असेल, त्या वेळी किडे पिकून रेशीम घालूं लागल्यास किडे चिकव्याचे कोसले तयार करितात. रेशमाचे किडे आपल्या तोडांतून तंतु काढून ज्या वेळीं कोसले तयार करितात, त्या वेळीं ती तार किड्यांच्या तोडांतील चिकट रसानें लडबडलेली असते. सुक्या हवेंत किडे आपल्या तोडांतून तार काढीत असतांना किडे तार तोडांतून काढतात न काढतात, तोंच ती तार वाळून जाते व गुंडाळी करतांना त्या तारेच्या दुसन्या भागास चिकटली जात नाहीं. ओलसर हवेंत तार न वाळल्याने ती तार त्या तारेच्या दुसऱ्या भागास चिकटली जाते. असल्या चिकटलेल्या तारेच्या कोस- ल्याचें रेशीम काढावयास अतिशय त्रास पडतो. कोस- . त्याची तार काढीत असतां ती वारंवार तुटते. असल्या कोसल्यांचें रेशीम काढावयास अतिशय मेहनत पडल्याने या कोसल्यांची किंमत जवळ जवळ जोड कोसल्यां इतकीच होते. ओलसर हवा असतांना अथवा पावसाळ्यांत जेव्हां कपडे वाळावयास फार वेळ लागतो, अशा वेळी किडे