पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ रलि हवा उष्ण अथवा थंड असल्यास कृतीनें घरांतील हवेच्या उष्णतेचें मान आपणास पाहिजे तितकें जवळ जवळ राखतां यावें, अशा प्रकारचें घर असलें, ह्मणजे त्यांत किडे पाळण्यास हरकत नाहीं. जेथील हवा ६० ते १०० डिग्रीच्या उष्णतेवर असते, व जेथील हवा एकदम थंड किंवा उष्ण होत नाहीं, अशा कोणत्याही ठिकाणी किडे पाळतां येतात. उष्णतेचें मान ७५ ते ८५ डिग्री जेथें आहे, व त्यांत एकाएकीं थंड व उष्ण असा फरक घडून येत नाहीं, अशा कोणत्याही ठिकाणी किडे चांगल्या रीतीने पाळतां येतात. ठोकळ मानानें झटलें ह्मणजे जी हवा मानवी प्राण्यास नैस- र्गिकपणे सुखकर होते, ती किड्यांसही मुखकर होय. घरांत किडे पाळिले असतां आंतील हवा एकदम थंड अथवा एकदम उष्ण होऊ देऊ नये. घरांतील हवा अतिशय सुकी असण्यापेक्षां थोडीशी दमट असल्यास विशेष चांगलें. या योगानें किड्यांस पाला घालून बराच वेळ झाला असला, तरी बराच वेळ पावेतों किड्यांवर घातलेला पाला ताज्या पाल्यासारखा राहू शकेल. एकाच कोठडीत तीन मणापेक्षां, म्हणजे १२० शेरांपेक्षां जास्त कोसले तयार करतील, इतक्या किड्यांपेक्षां जास्ती किडे पाळणें अपायकारक आहे. अनेक ठिकाणी थोडे थोडे किडे पाळण्यापासून विशेष हितकर परिणाम होतो. घरांत अवांतर सर्व शत्रूंपेक्षां या किड्यांस माश्यांपासून फार जपले पाहिजे. एक माशी एका दिवसांत दोनशे किड्यांस सहज मारूं शकते. माश्यांपासून किडयांचे