पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ नाश करण्याची ताकत असते; पण किड्यांचे शरीरांतील लवेचा नाश करण्याची ताकत नसते. जी हवा खेळली जाते, ती हवा दूपित बनून अवांतर किड्यांस दूषित करते. कोर्ट अथवा लाली. हा रोग होणें ह्मणजे प्लेग रोगाचें आगामी चिन्ह होय. जर बी प्लेगच्या जंतूंनीं विरहित असेल, ह्मणजे जर शुद्ध बीं वापरलें जाईल, तर किड्यांस हा रोगहो णार नाहीं. हा रोग झालेले किडे रेशीम न घालतां तसेच समाधिस्थ होतात. कांहींनीं घातल्यास फारच थोडें घालून समाधिस्थ होतात. किडे आंखुड आंखड होत गेल्यास व त्यांच्या कडा स्पष्ट दिसूं लागल्यास हा रोग आपले स्वरूप दाखवावयास लागला, असें समजावें. कधीं कधीं या रोगानें अतिशय नुकसान सोसावें लागते. किड्यांस हा रोग झाल्यास ते रेशीम न घालतां त्यांचें तसेंच रूपांतर होऊन फुलपाखरे होतात. व तीं फुलपाखरें अंडीं देखील घालतात. असलीं अंडीं बिया- करितां घेऊं नयेत. किड्यांस खाण्यास जो पाला घालतात, तो निःसत्त्व असल्यास, अथवा सावटीतील निःसत्त्व पाला किड्यांनी खाल्यास हा रोग होतो. जोड कोसला. कोठें कोठें दोन दोन तीन तीन किडे एकांत एक तारा गुंतवून एकच कोसला तयार करतात. कधीं कधीं याचें प्रमाण शेकडा चार पांच हैं निघतें. असले कोसले बीजा-