पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ काढल्यावर तें पाणी चांगले वाळल्याशिवाय विस्तवाचे साह्याने घरांत उबारा करूं नये. नाहीं तर वाफेचा उबारा घरांत होऊन त्याने या रोगाला किड्यांस व्यापण्यास संधि दिल्यासारखें होईल. घर घाण ठेवल्यास हा रोग सहजी उद्भवतो. घाणीचे योगानें काजळ्या रोग देखील उद्भवतो. किडे अवांतर कारणांनीं मलूल झाले असतील, अथवा दुसऱ्या कारणानें रोगट झाले असतील, तर हा रोग त्यांस कातीचे वेळीं तत्काळ जडतो. ज्या घरांत हा रोग उद्भवतो, तेथें या रोगाची लव तीन वर्षे पावेतों जिवंत राहते; ह्मणजे त्याची अपाय करण्याची शक्ति तीन वर्षे पावेतों राहू शकते. कित्येक अनाडी लोकांचा असा समज आहे कीं, एकदा हा रोग उद्भवल्यावर त्या ठिकाणीं तीन वर्षे पावेतों किडे पाळतां येत नाहींत. त्यांचें हें ह्मणणें कांहीं अंशी खरें आहे. शास्त्रीय रीतीनें घर शुद्ध केल्याशिवाय अथवा रोगाच्या वेचा नाश केल्याशिवाय त्या ठिकाणीं तीन वर्षे पावेतों किडे खरोखरीच पाळतां येत नाहींत; ह्मणजे, त्या अवधींत किडे पाळल्यास त्यांस खात्रीनें हा रोग होतो. या रोगाचे ल्वेने किडे व्यापले गेल्यास ते त्या किड्यांस मारल्याशिवाय राहणार नाहींत ; ह्मणजे, ते किडे मरतातच. ज्या वेळीं गंधकाची धुरी या रोगाचा नाश करण्याकरितां दिली जाते, त्या वेळी जे किडे या रोगाच्या लवेनें व्यापले गेलेले अस- तात, ते धुरी दिल्यानंतर मरतात. व पुन्हा त्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो. गंधकाच्या धुरींत सुट्या बेचा