पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ कधीही टाकू नयेत. नाहीं तर तोच तो रोग होण्याची भीत असते. सर्व सामान मोरचुदाचे पाण्याने धुऊन धुरी देऊन पुन्हां उपयोगांत घेतल्यास या रोगाचें भय राहणार नाहीं. पुन्हां रोग उद्भवल्यास घर व सामान शुद्ध करण्यांत चूक झाली, असें समजून वेळ न गमावितां किड्यांसकट घर शुद्ध करावें; व वर सांगितल्याप्रमाणें क्रिया करावी. या रोगाचे भया- स्तव सूक्ष्मदर्शक यंत्राने बी तपासून घेण्याची जरूर नाहीं. कारण, पुढील पिढीस अपाय करण्याचें सामर्थ्य या रोगांत नाहीं. या रोगाच्या लषेचा नाश ती किड्यांसह असल्यास एकाच वेळच्या गंधकाच्या धुरीनें होत नाहीं; ह्मणजे, एकच वेळ घर शुद्ध केल्यानें होत नाहीं. कारण या रोगाच्या लवेची अपाय करण्याची शक्ति तीन वर्षेपर्यंत राहू शकते. हा रोग होण्याची कारणें अनेक आहेत. गरमी, काळोख, वाफाऱ्याचा उबारा, घाण, रोगट लवेचा संसर्ग, वगैरे अनेक कारणांनी हा रोग उद्भवतो. घरांत माशा येऊ नयेत, ह्मणून कित्येक ठिकाणी किडे पाळावयाचे घरांत अंधार करून ठेवितात. पण अशा कारणांनी त्यांस हा रोग होण्याची धास्ती असते. घरांत अपरिमित गरमी असेल, तर किडे उबळले जाऊन त्यांस हा रोग होण्याची धास्ती असते. किड्यांचे घरांत लीद सांठवून कित्येक ठिकाणी थंडीचे दिवसांत घरांत किडे लवकर पिकावे ह्मणून लिदेच्या साह्याने उबारा करितात. पण त्याने घरांत वाफेचा उबारा व घाण होऊन किड्यांस बुरशी होते. पाणी शिंपडून केर