पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१ आपलें उम्र दोनदा कात किडे मेलेले आढळतात. तिसरे खेपेस एक तृतीयांश व चवथे खेपेस कात टाकण्याच्या वेळीं बहुतेक सर्व किड्यांचा फन्ना उडला जातो. त्यांतून कांहीं किडे जगल्यास ते कोशस्थ स्थितींत मरतात. जर या रोगानें स्वरूप पहिल्या खेपेस दाखविलें, तर पुढें टाकी पावेतों एकही किडा जिवंत आढळणार नाहीं. पहिल्या कात टाकण्याच्या सुमारास जर कांहीं किडे या रोगानें मेलेले आढळले, तर सर्व किडे वेळ न गमावतां दुसऱ्या चुन्याची भुकणी छाटलेल्या तट्टींत काढून पहिल्या सुपल्या मोरचुदाचे पाण्याने धुवाव्यात. घर स्वच्छ मोर- चुदाचे पाण्यानें सारवावें. चौखुर धुऊन नंतर किड्यांसह दुसऱ्या सुपल्या चौखुरावर ठेवून सर्व दारें व खिडक्या बंद करून घ्याव्यात. व अर्धा शेर गंधकाच्या भुकणीची धुरी किडे आंतच ठेवून करावी. याप्रमाणें घर दहा घंटे बंद करून नंतर किड्यांस पाला खावयास घालावा. गंधकाचे धुरीने इतर सर्व प्राणी मरतात; वेळीं मनुष्येंही दगावतील. पण या किड्यांस त्यापासून बिलकुल अपाय होऊं शकत नाहीं. पुढल्या खेपेस कात टाकण्याचे सुमारास जर हा रोग दृष्टोत्पत्तीस येईल, तर फिरून वर लिहिल्याप्रमाणें करावें. ह्मणजे या रोगाचा बराच नायनाट होईल. या रोगानें मेलेले किडे केव्हांही इकडे तिकडे टाकू नयेत. पीक घेतल्या- वर चांगले तऱ्हेनें घर शुद्ध करून पुन्हां पीक घ्यावें. रोग झालेल्या किड्यांनी केलेले कोसले घराचे आसपास ११