पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० मेल्यावर ताठरून खडूसारखे होतात. मेलेल्या किड्यांवर बारीक धुळीसारखे रजःकण पसरलेले नजरेस पडतात. पण त्यांची पाळेमुळे व गांठी सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिल्यास ती पाळेंमुळे शेवयांसारखी दिसून भुंडया दांडयाला गांठी गांठी आल्यासारखी दिसतात. या रोगानें व्यापलेल्या किड्यांच्या पृष्ठ भागावर हजारों बारिक बुरशी रोगाचे लवेचे रजःकण आढळतात. या लवेचा स्पर्श झाल्यापासून किडे आठ नऊ दिवसांचे आंत मरून त्यांपासून हजारों रोगाचे लवेचे रजःकण धुळींत मिसळ- तात, व अवांतर किड्यांस लागून त्यांचा नाश करतात. या रोगाचा आसर किडे ज्या वेळीं कात टाकीत अस- तात त्याच वेळी प्रायः चालतो. ज्या वेळी अंगावरील त्वचा निवर असते त्या वेळीं या लवेच्या रजःकणांचा प्रभाव रोगावर न चालतां कात टाकीत असतां असलेल्या मृदु त्वचेत त्यांचा शिरकाव ताबडतोब होऊं शकतो. हा रोग जडल्यास किडे फिकट होऊन हळुहळू त्यांचे चलनवलन बंद होतें. किडे मरून कांहीं वेळ झाल्यावर त्यांचा रंग तांबूस काळ- सर होऊन ते ताठरतात. सुमारे वीस घंत्र्यांनंतर ते चुन्याचे खडूच्या तुकड्यासारखे झालेले नजरेस येतात. या किड्यांच्या रोगाचे स्वरूप पहिल्यानें किड्यांनी कात टाकावयाचे सुमा- रास फार सौम्य तऱ्हेनें नजरेस येतें. ह्मणजे, पहिली कात टाकण्याच्या वेळेशिवाय या रोगानें मेलेले किडे आढळत नाहींत. दुसऱ्या कात टाकण्याच्या सुमारास दीड दोनशें