पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११९ रोग होतोच, असें नाहीं. जीं कारणें हा रोग उद्भवण्यास कारणीभूत होतात, तीं कारणें काजळ्या रोग उद्भवण् देखील कारणीभूत होतात. किड्यांस भोक पडल्या देखील क्वचित प्रसंगीं बिलोरी रोग उद्भवतो. कोणचेही रोगानें किडा व्यापलेला दिसल्यास त्यास तेथून काढून दूर पुरून टाकावें. तसेंच किड्यांस पाला वेळी अवेळीं खाव- यास मिळाल्यानेही हा रोग होतो. बुरशी ( मस्करडाईन ). प्लेग रोगाप्रमाणेंच बुरशी रोगानें रेशमाच्या किड्यांचा संहार होतो. पावसाळ्या दिवसांत एखादा पदार्थ कुबटून ज्याप्रमाणें त्यावर बुरशी चढते, तसल्याच जातीचा हा एक रोग आहे. हा रोग वनस्पतिकोटींतील आहे, असा कित्येकांचा समज आहे. ज्या वेळीं रेशमाचे किडे कात टाकीत असतात, व ज्या वेळीं रेशमाचे किडे हालचाल करीत नाहींत, अशा वेळीं या रोगाची लव रेशमाच्या किड्यांचे शरीरांत आपली पाळे घुसवून खोल पसरविते; ह्मणजे, किड्यांचे मासांत लवेची पाळें पसरली जातात, व त्याने शरीरांतील सर्व जागा व्यापली जाऊन किडा मरतो. त्याच्या शरीरावरील भागास या लवेच्या कणाला ज्या गांठी येतात, त्या फुटून त्यांतून हजारों लवेचे रजःकण बाहेर पडतात. व ते रजःकण अवांतर किड्यांस लाग- ल्यानें त्यांचीही तीच गति होते. हा रोग लागून किडे