पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ केल्यास या जातीचे रोगानें व्यापलेले किडे क्वचित आढ- ळतात. किडे एक दोन वेळचा पाला खाल्यावर पिकतील, इतके मोठे झाल्यावर त्यांस अखेरचें एक दोन वेळचें खाणें घालावयाचें ते जून व पिकलेली पानें घातल्यास अधिक श्रेयस्कर आहे. या योगानें हा रोग दवला जातो. या रोगानें व्यापलेले किडे ओळखणें विशेष कठिण नाहीं. किडे लिबलिबित होऊन त्यांचे पाय व बाजूच्या दोन्ही कडा पिवळ्या दिसूं लागतात. तसेंच किडे द्राक्षांसारखे - रसदार दिसूं लागतात. आपली जागा सोडून किडे भडकूं लागतात, व सुपलींतील किडे वर येऊन सुपलीवरून खालीं पडूं लागतात.अशा समयीं किड्यांस हा रोग झाला आहे, असें समजावें. किड्यांस पहिल्याने झाडावरचे पाल्यावर अथवा जून पाल्यावर पाळून नंतर किड्यांस रसभरित पाला खावयास घातला असतां हा रोग होतो. जर मनुष्य अशक्त असेल, तर त्यास कोणचाही रोग तत्काल होऊं शकतो. तद्वतच जर किडे प्लेग रोगानें दूपित झाले असतील, तर त्यांस अवांतर रोग तत्काळ जडतात. त्याचप्रमाणें बिलोरी रोगही जडतो. ह्मणजे, जर किड्यांवर प्लेगाची छाया पडली असेल, तर त्यांस बिलोरी रोग लवकर बाधतो. या रोगानें मेलेल्या किड्यांचा लेह सूक्ष्मदर्शक यंत्रांत तपासल्यास देहाचे रजःकण स्फटिकासारखे दिसतात. कांहीं गोल कण राळ्याचे आकाराचे पारदर्शक दिसतात. त्यांत कांहीं चित्रविचित्र पट्टे नजरेस पडतात. या रोगाचे किड्यांचे संततीस हा