पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११७ शोषून घेतो, व असला पाला मध्यंतरी किड्यांस खावयास मिळाल्यास त्यांस बिलोरी रोग होतो. अशा समयीं पाला तोडून आणून घरांत सांठवावा. व चुन्याच्या पेठ्यांची दारें घरांत उघडी ठेवून पाला ज्या खोलींत सांठविला असेल, तिची सर्व दारें व कोठड्या बंद कराव्यात. ह्मणजे चुन्याच्या कळ्यांच्या नैसर्गिक गुणानें पाल्याने पावसाचे पाण्याचा अंश जो शोपिलेला असतो तो अंश, ह्मणजे ओलावा, चुन्याच्या कळ्या शोषून घेतील. मग तो पाला किड्यांस घातल्यास त्यांस बिलोरी रोग होण्याची धास्ती राहणार नाहीं. बंगाल जातीच्या लागवडीचे पाल्यावर पाळलेल्या किड्यांस अवांतर जातीच्या पाल्यावर पाळ- लेल्या किड्यांपेक्षां अधिक लौकर हा रोग झालेला नजरेस येतो. याचें कारण हैं कीं, लागवड खुरटी असल्यानें त्याची जसजशी जोराने वारंवार वाढ होते, तसतसा जमिनीं- तील ओलावा अधिक शोषला जातो. ह्मणजे थोड्याशा फांद्यांच्या पोषणास वाजवीपेक्षां जास्ती पोपक रस मुळे पुरवीत असल्यानें तो पाला अवांतर पाल्यापेक्षां अधिक रसभरित असतो. खुरठ्या लागवडीचे पाल्यावर किडे पाळल्यास बिलोरी रोग होतोच, असें कोणी समजूं नये. पण अखेरीच्या स्थितीत अवांतर जातीचे लागवडीवर पाळलेल्या किड्यांपेक्षां खुरच्या लागवडीवर पाळलेल्या किड्यांत या रोगाचे प्रमाण जास्ती आढळून येतें. किडे एक दोन दिवसांत पिकतील अशा वेळेपासून मोठ्या झाडाचे पाल्यावर किड्यांचे संगोपन