पान:तुतीपासून रेशीम.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ ( बिलोरी व ग्लसरी. ) प्लेग व बुरशी यांचे खालोखाल या रोगानें रेशमाचे किडे पाळणारास नुकसान सोसावें लागतें. ह्या रोगाचे जंतु नाहींत. तसेंच, हा रोग प्राणिज अथवा वनस्पतिकोटींतील नाहीं. हा रोग प्लेग, काजळ्या व बुरशी या रोगांसारखा सांस- र्गिक नाहीं. परंतु या रोगाने मेलेले किडे तसेच सुपलींत ठेवणें भयंकर आहे. कारण ज्याप्रमाणें प्रेत घरांत ठेवण्या- पासून कांहींना कांहीं रोग उद्भवण्याची भीति असते, तसेंच या रोगाचेंही आहे. किड्यांनी चवथी कात टाकल्यानंतर हा रोग दृष्टोत्पत्तीस येतो; नव्हे, या रोगानें किड्यांचा संहार होतो. बहुतेक सर्व जातींचे रोग ही चवथी कात टाकल्यावर नजरेस येतात. हा रोग होण्याची कारणें व काजळ्या रोग होण्याची कारणे कांहीं कांहीं एकच आहेत. या रोगाची कारणें हुडकून काढणें कांहीं कठिण नाहीं. किडे कितीही चांगल्या रीतीनें पाळले, तरी या रोगानें व्यापिलेले थोडे तरी किडे अखेरचे स्थितींत आढळतात. किड्यांच्या पो- टांत ओलावा गेल्यानें किड्यांस बिलोरी रोग होतो. किडे लहान असतांना जून व मागून कोवळा पाला किड्यांस खावयास घातल्यास किड्यांस हा रोग उद्भवतो. डिसेंबरपासून जून महिन्या पावेतों हवा अतिशय सुकी असते. व तींत उष्णता असते. अशा दिवसांत किड्यांस कमी रसाचा पाला खावयासं मिळत असतो. मध्यंतरीं एकाएकीं पाऊस पडल्यानें पाला पाणी