पान:तुतीपासून रेशीम.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११५ काजळ्या रोग होतो. तसेंच सावटींतील व नव्या लागव- डीचा धुमाऱ्याचा पाला खाऊन संगोपन झालेल्या किड्यांस हा रोग होतो. अशा पाल्यावर जोपासना केलेले किडे रोगांनी • व्यापल्यास जून व कोमजलेला पाला त्यांस खावयास घालून घरांतील हवा चुन्याचे साहाय्यानें सुकी करावी. घरांत स्वच्छ हवा नसल्यास हा रोग होण्याची भीति असते. स्वच्छ हवा ठेवण्याकरितां घरास गवाक्षद्वारे असावीत. अतिशय जून व भगरा पाला किड्यांनी खाल्यास त्यांस हा रोग होतो. किडे पिकत असतील किंवा पिकावयाचे लायकीचे झाले असतील, ह्मणजे किड्यांनी चवथी कात टाकल्यानंतर, जून पाला खावयास घातल्यानें नुकसान न होतां उलट फायदा होतो. सूरचे बाजूस काजळ्या रोग प्रायः आढळतो. याचें कारण, किड्यांच्या अखेरीचे दिवसांत त्यांस पांच सहा वेळां खावयास घालतात, हें होय. अतिशय रस असलेला पाला खाल्यास क्वचित प्रसंगीं रसाचे रूपानें किड्यांचे तोंडातून रस बाहेर पडूं लागतो. हा प्रकार ह्मणजे काजळ्या व बिलोरी रोगाची आगामी सूचना होय. अशा वेळीं चुन्याच्या पेटीचीं द्वारे उघडी ठेवावीत, व सर्व खिडक्या बंद करून ठेवाव्यात. एका खोलींत दोन मण चुन्याच्या ताज्या कळ्या उघड्या ठेवल्या ह्मणजे पुरे. किरळ पडलेला व अकडी झालेला पाला किड्यांनीं खाल्यास किड्यांस काजळ्या रोग होऊन किडे मरतात. किड्यांस पंच्याऐशीं डिग्री फारेन- हाईटवर पारा असलेल्या हवेंत, ह्मणजे त्या घरांतील हवेंत, पाळल्यास त्यांस हा रोग होण्याचा संभव आहे.