पान:तुतीपासून रेशीम.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचेच अनुकरण करतील. अनुकरण करणारे अज्ञानी लोक निवळ एक जसें करितो तद्वतचं आचरण करूं लागतात. पण कारणाकडे लक्ष देत नाहीत. शेतांत वाफ्यास पाणी दिल्यावर त्यास खुरपणी देऊन वरची जमीन सैल करून ठेवण्याची चाल कित्येक ठिकाणी आहे, व त्याचें अनुकरण करणारेही बरेच लोक आहेत; पण तसें करण्यांत काय होते, हें पुष्कळांना सांगतां येत नाहीं. परंतु त्यांतील दर्दी मात्र सांगूं शकतो कीं, वरील तळ भुसभुशीत झाल्या कारणानें त्याचेखालील मातीचा थर बरेच दिवस ओलसर राहून वाजवीपेक्षां पांच सात दिवस जास्त पाणी घ्यावयाची जरूर लागत नाहीं. हैं जसें अनुसरणारास माहीत नसून याचे फक्त अनुकरण करणे एवढेच त्याला माहित असतें, तद्वतच एकदां सशास्त्र उदाहरण लोकांस आपल्या कृतीनें दाखविल्यास ते त्याचेंच अनुकरण करतील. आतां आपण या धंद्यास जें कांहीं साहित्य लागते, त्याकडे वळू. घर. किडे पाळावयाकरितां घर असें असावें कीं, त्यांत लागेल तेव्हां प्रत्येक खोलींत हवा चारी बाजूनें खेळती राहील, व लागेल त्या वेळीं आंत बाहेर खेळणारी हवा बंद करतां येईल. घर बंद केलें असतां बाहेरच्या बदलणाऱ्या हवेचा परिणाम ताबडतोब ज्या घरांत होऊ शकेल, असें घर किडे पाळण्यास सर्वथैव निरुपयोगी होय. ह्मणजे बाहे-