पान:तुतीपासून रेशीम.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ वेळ खावयास घालून चवथी कात किड्यांनी टाकल्यावर दिवसांतून तीन वेळ खावयास घातल्यास किड्यांस हा रोग झालेला आढळणार नाहीं. पहिल्या दोन काती टाकण्यापूर्वी दिवसांतून पांच सहा वेळ, पुढील दोन काती टाकी पावेतों दिवसांतून चारवेळ, व चवथी कात टाकल्यावर दिवसांतून तीन वेळ, किड्यांस खावयास घातल्यास किडे चांगले सशक्त व जोरदार होऊन ते घट्ट व मोठे कोसले घालतात. अखे- रच्या किड्यांचे स्थितीत किड्यांस पांच सहा वेळ पाला घातल्यास त्यांस हटकून काजळ्या रोग होतो. किड्यांनी चवथी कात टाकल्यावर किड्यांस एक दोन घंटे कांहीं एक खावयास नसल्यास तें त्यांस फायदेशीर आहे. किडे दाट ठेवल्याने देखील काजळ्या रोग होतो. होतील तितके किडे विरळ विरळ पाळावेत. ह्मणजे, प्रत्येक किड्यांत किड्याइतकी मोकळी जागा राहील, असे किडे ठेवावेत. किड्यांवर धूळ उडाल्याने हा रोग होतो. घरांतील केर काढतांना धुराळा न उडेल अशा रीतीनें किडे पाळीत असलेल्या खोलींतील केर काढावा. पाणी शिंपडून केर काढीत गेल्यास धुरळा उडणार नाहीं. कित्येक ठिकाणीं केर काढण्या ऐवजीं सारविण्याची चाल आहे. ही रीत वरी, असें ह्मटल्यास हरकत नाहीं. झाडें पाण्यांत बुडाली असून वाळली असतील, अशा झाडांचा पाला अथवा गदळ पाण्यांत बुचकळून काढलेला पाला किड्यांस घातल्यास काजळ्या रोग होतो. अतिशय रस असलेला पाला किड्यांनी खाल्यास