पान:तुतीपासून रेशीम.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३ कशाही स्थितीत अंडी असली, तरी फुटावयाचे आधीं मोर- चुताचे पाण्यांत धुतलीच पाहिजेत. अशक्त किड्यांपासून वीं धरलें असेल, किंवा रोगट अंड्यांपासून बीं धरलें असेल, तर हा रोग होण्याची भीति असते. ह्मणून अंडीं खरीद करण्यापूर्वी ज्या किड्यांपासून तीं अंडी घेतलीं अस- तील, ते किडे जेथे पाळले जात असतील, तेथें जाऊन किडे सशक्त आहेत कीं नाहींत, हे पाहण्याची कित्येक किडे पाळणारांची चाल असते. ही चाल कांहीं वाईट नाहीं. किड्यांमध्ये रोग असल्यास किडे पिकत असतां आपले प्रकट रूप दाखवितात. अशा वेळीं त्यांस जाऊन पाहिल्याने अशक्त व रोगट किड्यांचें बी पदरांत पडण्याची धास्ती नसते. कित्येक ठिकाणी अंड्यां ऐवजीं कोसले विकत घे ण्याची चाल आहे. कोसले विकत घेऊन त्यांपासून घरांत वीं धरून तीं अंडीं ज्यांनी घातली असतील, त्यांस सूक्ष्म- दर्शक यंत्राने तपासतां येतें. कृतीनें उष्णता वाढवून लव- कर किडे पिकविल्यास त्यांचे संततीस काजळ्या रोग होतो. पण जर अंडी मोरचुताचे पाण्याने चुतलीं, तर हा दोष नाहींसा होतो. किडे पाळीत असतां किड्यांत काजळ्या रोग आढ- ळेल, परंतु त्यांत प्रायः प्लेग रोगाचे जंतु असणार नाहींत. असल्या किड्यांच्या संततीचे चांगल्या जातीचे पाल्यावर सशा- . त्र रीतीने संगोपन केलें, तर त्यांस काजळ्या रोग होणार नाहीं. किड्यांस वेळोवेळीं खावयास घातल्यानें काजळ्या रोग होतो. किडे लहान असतां त्यांस समान अंतराने पांच सहा