Jump to content

पान:तुतीपासून रेशीम.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ व ण्याची संवय असते. पण त्यानें पुढें वाईट परिणाम होतो. आ वर लिहिल्याप्रमाणें किडे पाळल्यास कधींही त्यांचे पिकाचा नाश न होतां तें पीक बियाचे उपयोगास घेण्याचे लायकीचें होईल. युरोपमध्ये या रोगापासून फार नुकसा सोसावें लागतें. पिकेंच्या पिके या रोगापासून निखालस मातींत मिळाली आहेत. आपल्या इकडे काजळ्या रोग युरोप देशा इतक्या भयंकर प्रमाणांत आढळून येत नाहीं. आपल्या इकडे प्लेग व युरोपांत काजळ्या, या रोगाने हा धंदा करणारांस प्रायः नुकसान सोसावें लागतें. वार्षिक किड्यांचे जातींत या रोगांचा फैलाव विशेषेकरून दिसून येतो. याचें कारण या जातीच्या किड्यांची अंडी अकरा महिने राहतात, त्या अवधींत त्यांची अनास्था होते, हैं होय. सशास्त्र रीतीनें किडे पाळीत गेल्यास काजळ्याच काय, पण इतरही कोणत्या रोगा- पासून भय बाळगण्याचें कारण नाहीं. वान्यांत अंडीं राहि- ल्यास, अतिशय गरमी अथवा सरदी अंड्यांस लागल्यास, किंवा अंडी उबल्यास, त्यापासून होणाऱ्या किड्यांस हा रोग झालेला आढळतो. उन्हाचीं किरणें अंड्यांस लागल्यास तीं तांबडीं पडतात. व त्यांतून अंडी फुटून किडे बाहेर पडत नाहींत. अवांतर लाल न झालेल्या अंड्यांपासून झालेल्या किड्यांस हा रोग नजरेस येतो. मोरचुताचे पाण्यानें धुतल्यास हवेच्या फेरफाराचा परिणाम किड्यांस बाधत नाहीं. पोस्टांतून आलेल्या अंड्यांस हवेच्या फेरफारांतून यावें लागतें. असल्या अंड्यांस बहुधा काजळ्या रोग जडतो.