पान:तुतीपासून रेशीम.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१११ किड्यांचे अंगावर धूळ उडाल्यानें, व किडे सुपल्यांत दाट पाळल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो. किड्यांची लीद एकास एक माळेप्रमाणें चिकटलेली आढळेल, तर किड्यांस हा रोग झाला आहे, असें समजावें. घाण येणाऱ्या घरांत किडे पाळीत गेल्यास त्यांस हा रोग होण्याचा संभव असतो. या रोगाचे जंतु सूक्ष्मदर्शक यंत्रांत पांच आकाराचे दिस- तात. हे जंतु देखील वयमानाप्रमाणें आपला आकार बद लतात. या रोगाचा पूर्णावस्थेस पावलेला जंतु सूक्ष्मदर्शक यंत्रांत राळ्या एवढा काळसर ठिपका पडल्याप्रमाणें अथवा पोकळ काळसर दिसतो. पहिल्या स्थितींत बारीक बारीक काळे ठिपके, दुसरींत एका पुढें एक अशा पांच सहा बारिक ठिपक्यांच्या माळा, तिसरींत पोवळ्याचे अथवा एका पुढें एक पोंवळ्याप्रमाणें, चवथींत पेट्या अथवा टिका या दागिन्याप्रमाणे, व पांचवींत राळ्या एवढे काळे ठिपके, याप्रमाणें सूक्ष्मदर्शक यंत्रांत ह्या किड्यांचे जंतु नजरेस पड- तात. प्लेग व काजळ्या हे दोनच रोग पिढीजाद चालणारे होत. या रोगांपैकीं एखादा जंतु नजरेस पडल्यास, ह्मणजे सूक्ष्मदर्शक यंत्राचे टप्यांत काचेवर आढळल्यास, त्या मादीनें घातलेलीं अंडीं दूपित समजून उपयोगांत घेऊं नयेत. इतर रोगाचे जंतूंस किड्यांचे पुढील पिढीस अपाय करण्याचें सामर्थ्य नसतें. एखादा किडा सुपलींत मेलेला आढळल्यास ताबडतोब तेथून काढून दूर नेऊन टाकावा. कित्येकांस आळसानें तेथल्या तेथेंच गदळ अथवा वेंचलेले किडे टाक-