पान:तुतीपासून रेशीम.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० वापरतां शुद्ध बीं वापरावें. व सर्व घर शुद्ध करून सशास्त्र किडे पाळले असतां कोणचेही रोगास भ्यावयाचें कारण नाहीं. पांच चार पिकांनंतर निराळ्या हवेंतील जमिनी- तील बीजाचा बदल करावा. विजाची अदलाबदल केल्यानें वाजवीपेक्षां जास्ती हितकर परिणाम होऊन सर्व जातींचे रोगांचा जोर कमी होतो. या किड्यांचे जंतु वनस्पति- कोटींतील आहेत, किंवा प्राणिकोटीतील आहेत, याचा अद्याप पावेतों निर्णय झाला नाहीं. व तसेंच या जंतूंची वृद्धि कशी होते, हें अद्याप पावेतों निश्चित ठरलें नाहीं. कित्येकांचा असा समज आहे कीं, पूर्णावस्थेस पावलेल्या जंतूंपासून हजारों जंतु तयार होतात. किड्यांस सड लागून अथवा अवांतर कारणानें किडा मेल्यास त्या मृत किड्याचे शरीरावर जी हवा खेळली जाते, ती हवा दूषित बनून अवांतर किड्यांस दूषित करते. मनुष्यें किंवा जना- वरे यांचें नेहमींपेक्षां निराळ्या तऱ्हेने संगोपन केल्यास त्यांस कांहीं ना कांहीं रोग होतातच. तसल्याच जातींपैकीं प्लेग हा रोग आहे. किरळ पडलेला पाला अथवा खुरट्या लागव डीचा पाला यांवर किडे पाळल्यास त्यांस प्लेग रोग होणें स्वाभाविक आहे. काजळ्या (फ्लॅसरी). हा रोग देखील पिढीजाद चालणान्या रोगांपैकीच एक आहे. उष्णतेच्या योगानें, गदळ पाला खावयास घातल्यानें,