पान:तुतीपासून रेशीम.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०९ लेह तपासतांना एकही रोगट जंतु न दिसतां मादी निर्दोष ठरण्याचा संभव असतो. ह्मणून शक्य तितक्या उशिरानें माद्या तपासावयाचें काम सुरू करावें. आपले इकडे द्वैमा- सिक किड्यांची अंडी आठ ते बारा दिवसांत फुटतात. तेव्हां आपल्यास माद्यांनी अंडी घातल्या दिवसापासून पांचवे दिवशीं अंडी तपासण्याचें काम सुरू करावें लागतें. वार्षिक किड्यांचीं अंडीं दहा ते अकरा महिन्यांनी फुटत अस- या कारणाने एका महिन्यानें माद्या तपासावयाचें काम सुरू केलें असतां चालते. व त्या माद्या तपासावयाचे काम सहज होऊन तें काम पायाशुद्ध होते. सूक्ष्मदर्शक यंत्राने चांगले काम करणारा ह्मणजे सरावलेला माणूस रोगट ह्मणजे दूषित माद्या लागलीच ओळखून काढतो. लेहांत एखादा जंतु दिसल्यास तें बी रोगट असें समजून कधीही घेऊं नये. प्लेग रोगाचे जंतु सुमारें सात महिने जिवंत राहू शक- तात. ह्मणजे त्यांची अपाय करण्याची शक्ति सात महिने राहू शकते. पण जर ते जंतु अंड्यांत असतील, तर सतरा महिने पावेतों देखील त्यांची अपाय करण्याची शक्ति राहू शकते. वार्षिक जातीचे किड्यांचें शास्त्रीय वीं वापरित गेल्यास व वर्षांतून एक वेळ पीक घेत गेल्यास, या रोगापासून नुक- सान सोसावे लागणार नाहीं. तसेंच द्वैमासिक किड्यांचें शास्त्रीय वीं वापरीत गेल्यास, अथवा किडे अठ्ठावीस दिव- सांचे आंत पिकवित गेल्यास, या रोगापासून विशेष भ्यात्र- याची जरूरी नाहीं. सारांश इतकाच कीं, रोगट वीं न १०