पान:तुतीपासून रेशीम.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ जावें कीं, बी दूषित होतें; ह्मणजे, अंडी प्लेग झालेल्या रोगाचीं होतीं. आपल्या इकडे थंडीचे दिवसांखेरीज अवां- तर दिवसांत तीस दिवसांचे आंत किडे पिकतात. तेव्हां शुद्ध बी वापरले गेल्यास याची विशेष भीति बाळगण्याची जरूर नाहीं. किडे कोणत्याही स्थितीत असोत, बुल्याच्या स्थितीत असोत, अथवा कोशस्थ स्थितीत असोत, अथवा फुलपाखराच्या स्थितीत असोत, ते त्या रोगांनीं दूषित झाल्यापासून विसावे दिवशीं मरतात. ह्मणजे, मरणारे किडे दूषित झाल्यापासून विसावे दिवशीं मरतात. तिसावे दिवशीं पुष्कळ किडे मरण्याचे कारण हें आहे की, एकादा किडा दूषित झाल्यास त्याचे संसर्गाने अवांतर किंडे दूषित होऊन संसर्ग झालेले सर्व किडे मरतात. ह्मणजे, जंतूंनी किडयास व्यापल्या दिवसापासून तो किडा विसावे दिवशीं मरतो. व त्या दूषित झालेल्या किड्यापासून हजारों जंतु पसरून अवांतर किडे दूषित होऊन त्यांचा संहार होता. सूक्ष्मदर्शक यंत्राने फुलपाखरांच्या माद्या तपासावयाचें काम जितकें उशीरा करावें, तितकें अधिक सोपें जातें. आणि जर कदाचित् तपासावयाचें काम सुरू करण्यास विलंब लागेल, तर तितके अधिक जंतु वाढून तपासावयाचे काम सोपें जातें. रेशीम घालावयाचे आधीं किड्यांस रोगट जंतु लागून ते दूषित होतील, तर ते माद्या तपासावयाचे दिवशीं त्या माद्यांच्या पोटांत दहा बारा दिवसांचे वाढल्यानें, ह्मणजे जंतूंचा पूर्ण प्रसार मादीचे शरीरांत न झाल्यानें, मादीचा