पान:तुतीपासून रेशीम.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०७ , न दिसतां चित्रविचित्र आकृति नजरेस पडतात. अशा समयी ते किडे रोगट आहेत, असें समजावें. अंडी शुद्ध आहेत की नाहींत, हैं तपासतांना वरील कोणत्याही आकृ- तीचे जंतु दिसल्यास तीं रोगट समजून घेऊं नयेत. शुद्ध बी वापरले गेले असूनही एखादे वेळीं तीस दिवसांनंतर किड्यांचा संहार झालेला पहाण्यांत येतो. याची कारणें अशी:- ( १ ) अंड्यांबरोबर दुसऱ्या रोगट जंतूंच्या अंड्यांची नक- ळत जोपासना केली जाते. (२) किड्यांच्या लिदीचें खत लाग- वडीस घातल्या कारणाने त्यांत रोगाचे जंतु असल्यास ते पा- ल्यावर जातात. व असला पाला किड्यांना घातल्यास पाल्या- बरोबर ते किड्यांच्या पोटांत जातात. व तेथून त्यांचा प्रसार होतो. (३) हवेंतून रोगाचे जंतु किड्यांवर येऊन त्या जंतूंच्या योगानें सर्व किडे दूषित होतात. घरांतील धुळींत रोगाचे जंतु असल्यास त्यांचा किड्यांत प्रसार होऊन किडे मरतात. इत्यादि कोणत्याना कोणत्या कारणानें किडयांस रोग होऊन किडे मरतात. पण अशा कारणानें किडे फुटल्यापासून तीस दिवसांचे आंत सर्व किडे न मरतां तीस दिवसांनंतर, ह्मणजे किडे जंतूनें दूषित झाल्यापासून तीस दिवसांनं- तर मरतात. सारांश, किडे मागाहून दूषित झाल्यास अगर केव्हांही फक्त या रोगानेंच दूषित झाल्यास दूषित झाल्या- दिवसापासून तिसावे दिवशीं प्रायः सर्व किड्यांत या रोगाचा प्रसार होऊन ते मरतात. पण जर तिसावे दिवशी पुष्कळ किडे मेलेले नजरेस पडतील, तर असें निर्विवाद सम-