पान:तुतीपासून रेशीम.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ लाटा, व स्थिर राहणारे ते रोगाचे कण व लेहाचे परमाणु समजावेत. रोगाचे जंतु कांहीं ठिपके ठिपके, कांहीं गोला- कार, कांहीं लांबट, व कांहीं बदामी आकाराचे दिसतात. कित्येकांची सभोवतालच्या कडेची जागा किंचित अधिक तेजस्वी दिसते. या किड्यांचे जंतु सात आकारांचे दिसतात. (१) काळे काळे वारिक ठिपके दिसून त्यांची सभोवतालची कड अधिक तेजस्वी दिसते. (२) तिळाच्या कक्षेसारखी कक्षा असून आंत ठिपके नजरेस येतात. ( ३ ) खेळाव- याच्या रिंगण्याच्या कक्षेसारखे किंवा इंग्रजी आठाचे आं- कड्यासारखे. (४) पेरूचे कक्षेसारखे असून आंत एखाद दुसरा ठिपका असलेले. (५) लांबट गोल कक्षा असून आंत ठिपके ठिपके असलेले. (६) मुगासारखी कक्षा असून कांहीं सफेत, कांहीं अर्धवट, व कांहीं पूर्ण काळे. (७) मुगासारखी कक्षा गोल असून मध्यावर काळी रेघ असते. हाच पूर्णत्व पावलेला जंतु होय. साधारण सूक्ष्मदर्शक यंत्रांत हे जंतु मुगापेक्षां मोठे दिसत नाहींत. पूर्णत्व पावलेला प्लेग रोगाचा जंतु फुलपाखरें तपासतानां प्रायः आढळत नाहीं. कदाचित् फुलपाखरे वाळून गेल्यावर एखादा जंतु पूर्ण वाढीचा दृष्टोत्पत्तीस येतो. पण असें क्वचितच वडतें. किडे लहान असतांना किडे रोगट असल्यास त्यांचा लेह तपासल्यास हे जंतु दिसतात. ह्मणजे, सुरवंटाचे स्थितींत प्रायः पूर्ण जंतु नजरेस पडतात. बाह्य दृष्टीने किडा रोगट दिसत असूनही सूक्ष्मदर्शक यंत्रांत प्लेग रोगाचा एकही जंतु