पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०५ हा रोग प्रथमारंभीं जडला असेल, त्यांस तो झाल्यापासून तो रोग पूर्णावस्थेस पोंचून विसावे दिवशीं किड्यास मारतो. व संसर्गानें इतर किडे तिसावे दिवशीं मरतात. जर किडे तीस दिवसांचे आंत पिकविले, तर ह्या एकाच रोगाची किड्यांस धास्ती राहणार नाहीं, ह्मणजे याच रोगानें किडे मरणार नाहींत. प्लेग व काजळ्या रोग एकसमयावच्छेदें करून किड्यांस जडतील, तर प्लेग रोगाचे जंतु दहाव अकरा दिवसांचे आंतच पूर्णावस्थेस पोहोंचून किडे मर- तील. प्लेग रोगाचे जंतूंनी किडे व्यापल्यास त्यांस अवांतर रोगही तत्काळ जडतात. सूक्ष्मदर्शक यंत्रांत या रोगाचे जंतु दिसतात. रोगजंतु जसजसे वयातीत होत जातील, तस- तसा त्यांचा आकार बदलत जातो. या रोगाचे जंतु वयो- मानाप्रमाणें सात आकारांचे नजरेस पडतात. सूक्ष्मदर्शक यंत्रांत यांचा लेह तपासूं लागल्यास, त्यांत बारीक बारीक ठिपके नजरेस येतात. लेह कांचेवर घेऊन ती कांच सूक्ष्मदर्शक यंत्राखालीं ठेवल्यास यंत्राचे नळींतून जेवढा भाग नजरेस पडतो, तेवढी ह्मणजे एकचतुर्थांश तिळाएवढी, जागा नळींतून पाहिल्यास ती दीड इंचाचे व्यासाची दिसते. व त्यांत ठिपक्यांचा बुजबुजाट नजरेस पडतो. त्यांत पाण्याचे जंतु, डोळ्यास न दिसणारे केराचे कण, हवेचे बुडबुडे, व रोगाचे जंतु, इतके प्रकार नजरेस पडतात. त्यांतून हलणारे कण पाण्याचे जंतु समजावेत. वांकड्या तिकड्या ज्या आकृत्या ते केराचे कण समजावेत. इकडे तिकडे हलणाऱ्या त्या हवेच्या