पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ घेणें निवळ अशक्य आहे. रेशमाचे किड्यांस प्लेग (पेत्रिन), काजळ्या (प्लसरी), बिलोरी (ग्लसरी), बुरशी ( मसकुर - डाईन), लाली (लाली अथवा रंजी ), जोड कोसला (डबल ककून), व चिकटा, हे रोग होतात. लेग (पेबिन ). माणसाळलेल्या रेशमाचे किड्यांस हा रोग आपोआप होतो. ह्मणजे, हा रोग होणे स्वाभाविक आहे. जर किड्यांत या रोगाचा मागमूसही नसेल, तर एकाएकीं हा रोग होऊन किडे मरणार नाहींत. जरी हा रोग स्वाभाविक आहे, तरी पहिल्याच खेपेस हा रोग आपोआप पैदा होऊन त्याच खेपेच्या सर्व किड्यांमध्ये याचा प्रसार होऊन सर्व किडे मरणार नाहीत. ह्या रोगाचे जंतु डोळ्याने दिसत नाहींत. किडे फुटल्यापासून तिसावे दिवशीं किडे एकाएकीं मेल्यास, किडे फिकट, अथवा सुरकुत्या पडलेले, अथवा मलूल दिसूं लागल्यास, किड्यांचा आकार लहान होत गेल्यास, किंवा अनुभवशीर किडे पाळणाऱ्याच्या हातांत किडे असूनही लहान मोठे किडे आढळल्यास, ह्मणजे लहान मोठ्या आका- राचे किडे दिसूं लागल्यास, त्यांस हा रोग झाला आहे, असें समजावें. या किड्यांतील दोनच रोग क्षयासारखे अथवा रक्तपितीसारखे वंशपरंपरेने चालणारे आहेत. रोगाचा जंतु वीस दिवसांत पूर्ण पावतो, व त्याचा सर्व किड्यांत पूर्ण . प्रसार होण्यास तीस दिवस लागतात. ह्मणजे, ज्या कड्यां