पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ रोग. रेशमाचे किड्यांस रोग नसते, व त्यांवर हवेचा परिणाम बाधक झाला नसता, तर आजकाल जिकडे तिकडे त्या धंद्याचा अतिशय प्रसार झाला असता. रेशमाचे किडे पाळून त्यांपासून खात्रीने पीक मिळेल, अशी आजपर्यंत स्थिति नव्हती. पण सशास्त्र किडे पाळणारांनी त्यास हर- ताळ लावला आहे. ह्मणजे. सशास्त्र किडे पाळल्यास हैं। पीक खात्रीचें आहे. सन १८४९ साली रेशमाचे किड्यांचे रोगाचे जंतूंचा शोध लागला गेला, व या वेळेपासून हैं खात्रीचें उत्पन्न धरलें गेलें आहे. कित्येक ठिकाणीं पूर्वी बहुतेक लोकांचा रेशमाचा धंदा असे. ह्मणजे, गांवांतील बहु- तेक सर्व लोक रेशमाचे किडे पाळीत असत. पण आतां तेथील लोकांस रेशमाचे किडे पाहून आश्रर्य वाटतें ! इतके ते या धंद्यासंबंधी अपरिचित झाले आहेत. याचे कारण रोग हैं होय. प्रत्येक चौखुरावर दहा ते बारापेक्षां जास्त सुपल्या न ठेवतां, तसेंच प्रत्येक सुपलीत तीन हजार किड्यां- पेक्षा जास्त किडे न ठेवतां, व शुद्ध किड्यांचें बी वापरून सशास्त्र रीतीनें किड्यांची जोपासना केली असतां, किड्यां रोगाची क्वचितच भीति असते. कित्येकांनी झाडांवर किडे पाळून त्यापासून या किड्यांची सुधारणा करण्याची खट- पट केली. पण त्यांत त्यांस अनेक कारणांनी यश आलें नाहीं. नैसर्गिक रीतीने किडे पाळून त्यांपासून फायदा करून