पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ तरी जेथे मोठ्या प्रमाणावर बी लागतें, तेथें हा खर्च जड वाटत नाहीं. आपल्या इकडे जर कोणी दहा दिवसांत फुटणारें असें वार्षिक किड्यांचें बी तयार करून विक्रीकरितां ठेवू लाग- तलि, तर सर्व लोक हेच किडे पाळावयास सुरवात करतील. बीं फुटावयाजोगें तयार करणें हें खटपटीचे काम आहे. व थोड्या अंड्यांकरितां असला खर्च परवडत नसल्यानें आपले इकडील किडे पाळणारे या किड्यांची दोन चार पिकें सालां- तून घेत नाहींत. पण जर कोणी असें वीं तयार करून देईल, तर जेथें रेशमाचे किडे पाळले जातात, तेथे याच किड्यांचे संगोपन करूं लागतील, व वीं तयार करून विकणारास देखील अपरिमित फायदा होईल. कारण या जातीच्या कोसल्यां- पासून अति उत्तम रेशीम निघतें, व त्यास भावही चांगला येतो. द्वैमासिक जातीसारखीं नैसर्गिक रीतीनें सालांतून जर पांच सहा पिके घेतां येत असती, तर वचितच या जातीशिवाय दुसन्या जातीचें वीं वापरले गेलें असतें. सर्व कोसले तयार झाल्यावर घर शुद्ध करावें, व दुसऱ्या खेपेकरितां उपयोगांत घ्यावें. शक्य असल्यास एकाच खोलींत वर वर पिके घेण्यापेक्षां एका आड एक एक पिक घेतले गेल्यास बरें. तयार झालेले कोसले किडे पाळावयाचे खोलींत केव्हांहीं सांठवू नयेत. कोसले तयार झाल्यावर चांगले उन्हांत वाळवून साधारण ओलसर जागेंत सांठवून ठेवावेत. जर विक्रीकरितांच कोसले तयार केले असतील, तर लागलेच विकून काढावेत.