पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१-०१ विकलेल्या कोसल्यांस येते. ह्मणजे, वाजवीपेक्षां चौपटीनें जास्त फायदा जेव्हां यापासून मिळू शकतो, तेव्हां याचा खर्च परवडेल. अवांतर ठिकाणी हवेच्या फेरफाराचा उप- योग करावा. हवेच्या फेरफाराकरितां नैनीताल व नील- गिरी वगैरे ठिकाणी अंडी कांहीं दिवस पाठवावी. व तेथील हवेंत वीस दिवस ठेवून परत आणली असतां हीं अंडीं फुटावयाजोगी होतात. अथवा बर्फाचे गिरणीत आंतील कोठडीत पंधरा वीस दिवस ठेवून नंतर बाहेरील हवेंत आणा- वीत. अंडी ठेवावयाचीं ती निदान पंचावनचे खालील अंशा- वर उष्णता असेल, अशा ठिकाणी ठेवावीत. जेथें बर्फ विपुल मिळत असेल, तेथे दोन पेट्या व बर्फ यांच्या साहाय्याने हवेच्या फेरफाराकरितां वरांतले घरांत व्यवस्था करितां येते. पेटीत पेटी चारी बाजूनें आंतील पेटीच्या सभोवती चार चार बोटें बर्फाचे तुकडे घालून ठेवावी. व आंतील पेटीत त्री ठेवून पेटी बंद करून घ्यावी. बंद केलेल्या पेटीत हवा खेळण्या- करितां दोन नळ्या लावून ठेवाव्या. व त्यांतील एका नळीचे तोंडाशीं दिवा लावून ठेवीत जावा. नळीच्या तोंडाशीं ज्योत असल्यानें त्या नळींतून आंतील हवा खेचली जाते. व आंतील हवा नाहींशी झाल्या कारणानें दुसऱ्या नळींतून बाहेरील हवा आत ओढली जाते. असल्या दोन पेटीच्या यंत्रास इंग्रजीत इन्क्यूबेटर ह्मणतात. रोज एक वेळ नवीन बर्फ घातले पाहिजे. अशा रीतीनें पेटींतील हवा पन्नास अंशापर्यंत राहू शकते. जरी यास खर्च बराच लागतो,