पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० अशा रीतीनें निथळून घेतात. व नंतर पुन्हां स्वच्छ दोन तीन वेळ निथळून घेतात. माझ्या मतें मुटी अंडी बारीक भोकाच्या चाळणीत घालून ती चाळण मोरचुदा पाण्यांत बुडवून दोन मिनिटांनी काढून घ्यावी, व नंतर तीत स्वच्छ पाणी हलक्या हातानें ओतावें. ह्मणजे त्यांतील पाणी आपोआप अंड्यांस धुवून निथळून जाईल. वार्षिक किड्यांच्या फुलपाखरांनी अंडी घातल्यावर त्यांस वीस पंच- वीस दिवसांनी तेथील हवेपेक्षा अतिशय थंड हवत महिना- भर ठेवून पुन्हा पहिल्या उष्णतेच्या ठिकाणी आणल्यास अंडीं आणविल्यापासून पंधरा वीस दिवसांचे आंत फुटतात. ह्मणजे, एकदम थंड व एकदम उष्ण हवेच्या फेरफाराने अंडी लवकर फुटतात. ह्या रीतीनें वार्षिक किड्यांचीं सालां- तून पांच चार पिके घेतां येतात. अंडी हैड्रोक्लोरिक असि- डांत बुडवून काढल्याने देखील लवकर फुटतात. कडक हैड्रोक्लोरिक असिडांत अंड्यांची पुरचुंडी पांच सात मिनिटें बुडवून ठेवून नंतर ती स्वच्छ पाण्यांत पांच चार वेळां धुवून वाळवावी. वाळविल्यानंतर दहा बारा दिवसांनी हीं मुद्रां अंडी फुटतात. पण हैड्रोक्लोरिक असिडाचे प्रयोगास खर्च फार येतो. ह्मणून हा प्रयोग नेहमींकरतां फायद्याचा नाहीं. हैड्रोक्लोरिक असिड अतिशय किमतीचें आहे. त्याचा उपयोग जेथे किडे बीजfवकरीकरतां पाळले जातात, तेथे केल्यास हा खर्च परवडेल. तंतु काढावयास जे कोसले त्रिकले जातात, त्यांपेक्षां चौपटीने जास्त किंमत बियांकरितां