पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९९ एकाच वेळी बहुतेक सर्व फुटतात. तीन चार दिवस याप्र- माणें अंडी ठेवण्यास विशेष अडचण वाटत नाहीं. अंडी फुटल्यावर त्यांवर जाळी पसरून बारीक पाला घालावा, व आंतील किडे पाल्यावर आल्यावर ते सर्व सुपलीत घ्यावे. जाळी उचलतांना अंडीं सुटी असल्या कारणानें तीं मुप- लींत जातात. त्यास असें करावें कीं, कागदास पुसट पुसट डिंक लावून त्यावर तीं सुटी अंडी पसरावीं, व तीं फुटल्या- वर छोट्या किड्यांप्रमाणे काढून घ्यावी. या अंड्यांस मोर- चुदाचे पाण्यानें जें धुवावयाचें तें ज्या पिशवीत अंडी ठेवली असतील, ती पिशवी अंड्यांसुद्धां मोरचुदाचे पाण्यांत बुडवावी, व ती तशीच चार पांच सेकंद ठेवून काढून घ्यावी. व नंतर शुद्ध पाण्यांत बारा वेळ बुडवून घ्यावी. अंड्यांवर मोरचुदाचा अंश राहिला नाहीं, अशी खात्री झाल्यावर पिशवीतील अंडी कागदा- वर अथवा रुमालावर पसरून वाळवावीत. अंडी केव्हांही उन्हांत वाळवू नयेत. तीं सावलीतच वाळविली पाहिजेत. अंडी कागदावर चिकटवावयाचीं तीं मोरचुदाचे पाण्यानें धुवून वाळल्यावर चिकटवावीत. नाहीं तर मोरचुदाचे पाण्यांत कागद बुचकळतांना डिंकानें चिकटविलेली अंडी कागदा- पासून सुटून पाण्यांत जातील. ह्मणून अंडी कापडांतच धुवावी. कित्येक ठिकाणी स्वच्छ ताह्मनांत अथवा परातींत मोरचुद्राचें पाणी करून त्यांत अंडी टाकतात. अंडीं जड असल्यानें तीं पाण्याचे तळाशी बसतात. नंतर एक दोन मिनिटांनी त्यांतील पाणी अंडी पाण्याबरोवर न जातील