पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ दाच्या तुकड्यांत चांगली चुरडावी, व पाण्याचे थेंब त्यांत मिसळून चांगला रद्दा करावा. एक महिन्यानंतर अंडी तपासावयास सुरवात केल्या कारणानें अंडी घातलेल्या माद्या बहुतेक वाळून गेलेल्या असतात. ह्मणून त्यांच्या रद्यांत पाणी मिळविल्याशिवाय त्यांचा लेह तपासावया जोगा होत नाहीं. द्वैमासिक जातीची फुलपाखरें नुकतीच मेलेलीं असतात, व कित्येक तपासणी करी पावेतों जिवंतही असतात. असल्या फुलपाखरांना चिरडल्यास त्यांचा रस पाण्यावांचूनही निघू शकतो. पण वार्षिक फुलपाखरे वाळलेली असल्या कारणानें त्यांचा लेह करण्यास त्यांत पाणी घातलेच पाहिजे. ज्या पुरचुंडीतील मादीच्या रसांत रोगाचे जंतु दिसतील, त्या मादीचीं अंडी दूपित ह्मणून फेकून द्यावी. व चांगल्या मादीची अंडी एका पिशवीत ठेवावी. सूक्ष्मदर्शक यंत्राचे काम झाल्यावर सर्व अंडी नीट जतन करून ठेवावीं, व कापडाचे सर्व तुकडे मोरचुदाचे पाण्यांत धुवून ते पुढील पिकाचे उपयोगाकरितां ठेवावे. मार्च महिन्याचे सुमारास अंडी फुटूं लागतात. ती एकदम एकाच दिवशी नाहींत. रोज थोडी थोडी फुटत असतात. ह्मणून तीं सम- शीतोष्ण हवेंत ठेवावी. अशा हवेंत असलेलीं अंडी तीन चार दिवसांत फुटतात. कित्येक ठिकाणी हीं अंडी थोडीशी काळसर झाली, ह्मणजे पिशवीत ठेवून ती पिशवी गळ्यांत अडकवून ठेवतात, व त्यावर कपडे घालतात. अशा रीतीनें अंडी दोन तीन दिवस ठेवली ह्मणजे पूर्ण पारवीं होऊन