पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९७ या जातीची फुलपाखरें बारा तेरा दिवसांत फुटून बाहेर येतात. व लहान जातीच्या किड्यांप्रमाणेच नर मादीचा त्याच दिवशी संयोग होऊन सायंकाळचे सुमारास मादी अंडी घालावयास सुरुवात करिते. द्वैमासिक जातीचीं फुल- पाखरे आपली अंडी घालतांना चिकट रसाने कशास तरी ती चिकटवितात. पण वार्षिक किडे सुटींच घालतात. द्वैमासिक किड्यांची अंडीं ज्याप्रमाणें कागदावर घालवितों, "त्याप्रमाणे वार्षिक किड्यांची अंडी कागदावर न घालतां कापडावर घालवावीं. कापडाचे औरस चौरस तीन तीन इंचाचे तुकडे करून त्या प्रत्येकावर एक एक डबडी ठेवून त्यांत एक एक फुलपाखराची संयोगांतून सोडविलेली मादी सोडावी, व त्या त्या कापडाचे तुकड्यावर माद्यांनी अंडी घातल्यावर डबडी काढून घेऊन अंडी व फुलपाखरें एकाच ठिकाणीं ठेवून त्यांची पुरचुंडी बांधावी. याप्रमाणे आपणांस जितक्या माद्यांची अंडी घ्यावयाची असतील, तितक्या पुरचुंड्या बांधून एका पेटीत घालून ठेवाव्या. अंड्यांस अति उष्ण अथवा अति थंड हवा लागू देऊ नये. पेट्यांपेक्षां मोठ्या मडक्यांत त्या पुरचुंड्या घालून त्यांवर दुसरें मडकें झांकणाकरितां तोंडावर उलटें बसवावें, ह्मणजे त्यांत एकाएकीं कांहीं जाऊं शकणार नाहीं. अंडीं अशा स्थितीत एक महिना राहिल्या- वर दुसऱ्या महिन्यांत सूक्ष्मदर्शक यंत्राने पारखण्याकरिता मडक्यांतून त्यांच्या पुरचुंड्या काढाव्या. प्रत्येक पुरचुंडी सोडून त्यांतील अंडी घातलेल्या वाळलेल्या मादीस काग- ९