पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७९

येथूनि सोडवा । आतां अनुभवेंसी देवा ॥ ३ ॥ तुका
ह्मणे जालें । एक मग हें निमालें ॥ ४ ॥

  ३२९. हरिचया भक्ता नाहीं भय चिता ।
दुःखनिवारिता नारायण ॥ १ ॥ नलगे वाहणे संसारउद्वेग |
जड़ों नेदी पांग देवराव ॥ २ ॥ असों द्यावा धीर सदा
समाधान । आहे नारायण जवळीच ॥ ३ ॥ तुका ह्मण
माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणे एके ॥ ४ ॥

  ३३०. कृपावंत किती । दीनं बहु आवडती ॥ १ ॥
त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिता ॥ २ ॥
भुलों नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥ ३ ॥ तुका
ह्मणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥ ४ ॥

  ३३१. आपुल्या महिमानें । धातु परिसे केले सोने
॥ १ ॥ तैसे न मन माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ २ ॥
गांवाखालील वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ॥ ३ ॥
तुका ह्मणे माती । केली कस्तूरीने सरती ॥ ४ ॥

३५. अनन्य भक्ति.

  ३३२. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आह्मां नारायण
तैशीपरी ॥ १ ॥ सर्व भावें लोभ्या आवडे हे धन । आम्हा
नारायण तैशापरी ॥ २ ॥ तुका ह्मणे एकविध झालें मन ।
विठ्ठलावांचून नेणें दुजें ॥ ३ ॥

  ३३३. तुजविण वाणी आणिकांची थोरी । तरी माझी
हरी जिव्हा झडो ॥ १ ॥ तुजविण चित्ता आवडे आणीक ।

_________________________________________

१ पराधीनपणा, दैन्य. २ प्रभावाने, ३ न मानी. ४ मोलवान केली