पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८०

तरी हा मेस्तक भंगा माझा ॥ २ ॥ नेत्री आणिकांसी पाहीन
आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥ ३ ॥ कथामृतपान
न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥ ४ ॥ तुका
ह्मणे काय वाचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥ ५ ॥

  ३३४. काय करू आन दैवते । एकाविण पंढरीनाथे
॥ १ ॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैंची
उरी ॥ २ ॥ अनेक दीपींचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश
॥ ३ ॥ तुका ह्मणे नेणें दुजें । एकाविण पंढरीराजे ॥ ४ ॥

  ३३५. कृष्ण गातां गीती कृष्ण ध्यातां चित्तीं । तेही
कृष्ण होती कृष्णध्यानें ॥ १ ॥ आसनीं शयनीं भोजनी
जेवितां । ह्मणा रे हा भोक्ता* नारायण ॥ २ ।। ओविये
दळणी गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम
॥ ३ ॥ नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती
नारायणा ॥ ४ ॥ तुका ह्मणे एका भावे भजा हरी । कांति
ते दुसरी रूप एक ॥ ५ ॥

  ३३६. सर्वभावें आलों तुजचि शरण । कायावाचामनेसहित
देवा ॥ १ ॥ आणिक दुसरे नये माझ्या मना । राहिली वासना
तुझ्या पायीं ॥ २ ॥ माझिये जीवींचे कांहीं. जडभारी ।
तुजविण वारी कोण एक ॥ ३ ॥ तुझे आह्मी दास आमुचा
तू ऋणी । चालत, दुरूनी आलों मागें ॥ ४ ॥ तुका ह्मणे
आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणे भेटी देई ॥ ५ ॥

  ३३७. सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी
॥ १ ॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं

_______________________________________

  • ( भोगिता.) १ निवारी.