पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७८

आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ २ ॥ सेवाभक्तीहीन नेणता
पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे
माझे सर्वही साधन । नामसंकीर्तन विठोबाचें ॥ ४ ॥

  ३२४. मी तों दीनाहून दीन । माझा तुज अभिमान
॥ १ ॥ मी तों आलो शरणागत । माझे करावें स्वहित
॥ २ ॥ दिनानाथा कृपाळुवा । सांभाळावे आपुल्या नांवा
॥ ३ ॥ तुका ह्मणे आतां । भले नव्हे मोकलितां ॥ ४ ॥

  ३२५. देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ती ।
तया इच्छा गति । हेंचि सुख आगळे ॥ १ ॥ या वैष्णवांचे
घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धिसिद्धि द्वारीं । कर जोडूनि
तिष्टती ॥ २ ॥ नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा
नाश । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥ ३ ॥

  ३२६. न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना। न कळसी
दर्शना धुंडाळतां ॥ १ ॥ न कळसी आगमा न कळसी
निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥ २ ॥ तुका ह्मणे
तुझा नाहीं अंतपार । ह्मणोनि विचार पडिला मज ॥ ३ ॥

  ३२७. बहुतां जातींचा केला अंगीकार । बहुतही
फार सर्वोत्तमें ॥ १ ॥ सरलाच नाहीं कोणाचये वेचें ।
अक्षोभ ठायींचे ठायीं आहे ॥ २ ॥ लागतचि नाहीं घेता
अंतपार । वसवी अंतर अणुचेही ॥ ३ ॥ तुका ह्मणे केला
होय टाकीऐसा । पुरवावी इच्छा धरिली ते ॥ ४ ॥

  ३२८. तुह्मी तों सदैव । अधीरपणे माझी हांव ॥ १ ॥
जळो आशेचें तें जिणें । टोंकतसों दीनपणे ॥ २ ॥


_______________________________________

१ सोडितां, त्यागतां,