पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७७

पीडिला । नाहीं विसरली पांडुरंगा ॥ ३ ॥ तुका ह्मणे तुझा
न पडावा विसर । दुःखाचे डोंगर झाले तरी ॥ ४ ॥

  ३१९. बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आह्मी
अविश्वासी सर्वभावें ॥ १ ॥ दंभे करी भक्ती सोंग दावी
जना । अंतरीं भावना वेगळिया ॥ २ ॥ चित्ता तू रे
साक्षी तुज कळे सर्व । किती करूं गर्व आतां पुढे ॥ ३ ॥
तुका ह्मणे देवा तू काय करिसी । कम दुस्तरासी
आमुचिया ॥ ४ ॥

  ३२०. हेंचि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥ १ ॥
येणे भाग्ये असों जीत । एवढे समर्पूनी चित्त ॥ २ ॥
सांभाळिलें देवा । मज अनाथाजी जीवा ॥ ३ ॥ जोडूनियां
कर । तुका विनवितो किंकर ॥ ४ ॥

  ३२१. जाऊ देवाचिया गांवा । देव देईल विसांवा
॥ १ ॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ २ ॥
घालू देवासीच भार । देव सुखाचा सागर ॥ ३ ॥ राहों
जवळी देवापाशीं । आतां जडोनी पायांसी ॥ ४ ॥ तुका
ह्मणे आह्मी बाळे । या देवाची लडिवाळे ॥ ५ ॥

  ३२२. अमिषाचिये आशें गळ गिळी मासा । फुटोनियां
घसा मरण पावे ॥ १ ॥ मरणाचे वेळीं करी तळमळ ।
आठवी कृपाळ तये वेळीं ॥ २ ॥ अंतकाळीं ज्याच्या नाम
आले मुखा । तुका ह्मणे सुखा पार नाहीं ॥ ३ ॥

  ३२३. मज अभयदान देई तू दातारा । कृपेच्या
सागरा मायबापा ॥ १ ॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं ।

_________________________________________

१ हेतु. २ च्या करंट्या कर्मास.