पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६

तैशी मज गोडी देई देवा ॥ ३ ॥ कीर्ती ऐकोनियां जालों
शरणागत । दासाचे तू हित करितोसी ॥ ४ ॥ तुका ह्मणे
मी तो दीन पापराशी । घालावे पाठीशीं मायबापा ॥ ५ ॥

  ३१४. वेडे वांकडे गाईन । परि मी तुझाचि ह्मणवीन
॥ १ ॥ मज तारीं दीनानाथा । ब्रीद साच करीं आतां ॥ २ ॥
केल्या अपराधांच्या राशी । म्हणऊनि आलों तुजपाशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे मज तारी । सांडीं ब्रीद नाहीं तरी ॥ ४ ॥

  ३१५. तू माझी माउली तू माझी साउली । पाहातों
वाटुली पांडुरंगे ॥ तूं मज येकला वडील धाकुला । तूं मज
आपुला सोयिरा जीव ॥ २ ॥ तुका म्हणे जीव तुजपाशीं
असे । तुजविण ओस सर्व दिशा ॥ ३ ॥

  ३१६. आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण
कामा येती अंतकाळीं ॥ १ ॥ तूं वो माझी सखी होसी
पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ २ ॥ काया वाचा मनें
हेचि आस करीं । पाउले गोजिरी चिंतीतसे ॥ ३ ॥ तुका
ह्मणे माझी पुरवी हे आस । धालीं ब्रह्मरस भोजन हें ॥ ४ ॥

  ३१७. अपराध झाले जरी असंख्यात । तरी कृपावंत
नाम तुझे ॥ १ ॥ तुझे लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां
वाट पहावी कवणाची ॥ २ ॥ मायबाप माझा रुक्मादेवीवर ।
हा दृढ निर्धार अंतरींचा ॥ ३ ॥ तुका ह्मणे कोणे गोष्टीचे
संकट । न घालीं मज भेट नारायणा ॥ ४ ॥

  ३१८. पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या
देवासी आठविती ॥ १ ॥ प्रल्हादासी पिता करितो जाचणी
परि तो स्मरे मनीं नारायण ॥ २ ॥ सुदामा ब्राह्मण दरिद्रे