पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७४

पंढरिराया ॥ २ ॥ जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा
नेदी थारा ॥ ३ ॥ तुका ह्मणे आलो शरण । देवा त्वां कां
धरिलें मौन ॥ ४ ॥

  ३०७. तुज ह्मणतील कृपेचा सागर । तरि का केला
धीरे पांडुरंगा ॥ १ ॥ आझुनि कां नये तुज माझी दया ।
काय देवराया पाहतोसी ॥ २ ॥ आळवितों जैसे पाडस
कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥ ३ ॥ प्रेमरस
पान्हा पाजीं माझे आई। धांवें वो विठाई वोरसोनि ॥ ४ ॥
तुका ह्मणे माझे कोण हरी दुःख | तुजविण एक पांडुरंगा ॥ ५ ॥

  ३०८. घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरण
सेवा साधावया ॥ १ ॥ हरिनामकीर्तन संतांचे पूजन ।
घालू लोटांगण महाद्वारीं ॥ २ ॥ आनंदें निर्भर असों भलते
ठायीं । सुखदुःखें नाहीं चाड आह्मां ॥ ३ ॥ आणीक
सायास न करीं न धरी आस । होईन उदास सर्व भावे
॥ ४ ॥ मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों
तैसी तुका ह्मणे ॥ ५ ॥

  ३०९. कासियानें पूजा करूं केशीराजा । हाचि संदेह
माझा फेडीं आतां ॥ १ ॥ उदकें न्हाणू तरी स्वरूप तें
तुझें । तेथे काय माझे वेचे देवा ॥ २ ॥ गंधाचा सुगंध
पुष्पांचा परिमळ । तेथे मी दुर्बळ काय वाहूं ॥ ३ ॥ वाहूं
दक्षिणा तरी धातु नारायण । ब्रह्म तेंचि अन्न दुजें काई ॥ ४ ॥
गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं
कोठे ॥ ५ ॥ फळदाता तूच तांबोल अक्षता । तेथे मी

________________________________________

१ उशीर. २ हरणी. ३ काम करणारी,