पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७३

  ३०३. नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको
दातारा घड़ों देऊं ॥ १ ॥ ऐसिये कृपेची भाकित करुणा ।
आहेस तू राणा उदारांचा ॥ २ ॥ पराविया नारी आणि
परधना । नको देऊं मनावरी येऊ ॥ ३ ॥ भूतांचा मत्सर
आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥ ४ ॥ देह,
अभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊ
॥ ५ ॥ तुका ह्मणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार
पडों देऊं ॥ ६ ॥

  ३०४. पतित मी पापी शरण आलों तुज । राखीं
माझी लाज पांडुरंगा ॥ १ ॥ तारियेले भक्त न कळे तुझा
अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ २ ॥ द्रौपदी बहीणी
वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥ ३ ॥
प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार । माझा कां विसर पांडुरंगा
॥ ४ ॥ सुदामा ब्राह्मण दरिद्रे पीडिला । आपणाऐसा
केला पांडुरंगा ॥ ५ ॥ तुका ह्मणे तुज शरण निजभावें* ।
पाप निर्दाळावें पांडुरंगा ॥ ६ ॥

  ३०५. भागल्याचे तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया
घाली प्रेमपान्हा ॥ १ ॥ ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी ।
सुखाचीच राशी पांडुरंग ॥ २ ॥ सकळां सन्मुख कृपेचिया
दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥ ३ ॥ तुका ह्मणे येथे
आतां उरला कैंचा । अनंता जन्मींचा शीणभाग ॥ ४ ॥

  ३०६. गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी
तिसी ॥ १ ॥ तिणे जावें कवण्या ठायां । मज सांगा

___________________________________________

  • ( जीवें भावें. )

४-५९१-६५०७