पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७२

नारायणा आळवावें ॥ १ ॥ काय जाणा तुह्मी दुर्बळाचे जिणें ।
वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ २ ॥ देती घेती करिती खटपटा
आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥ ३ ॥ दिवस बोटी
आह्मीं धरियेलें माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥ ४ ॥
तुका ह्मणे मग देसी कोण्या काळे । चुकुर दुर्बळे होतो आह्मी ॥ ६ ॥

  ३००. विठ्ठला रे तू उदाराचा राव । विठ्ठला तू जीव
या जगाचा ॥ १ ॥ विठ्ठला रे तू उदाराची राशी । विठ्ठला
तुजपाशीं सकळ सिद्धी ॥ २ ॥ विठ्ठला रे तुझे नाम बहु
गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥ ३ ॥ विठ्ठला रे तुझे
श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागले ध्यान मनीं ॥ ४ ॥ विठ्ठला
रे वाचे बोला बहु रस । विठ्ठला रे सोस घेतला जीवें ॥ ५ ॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तू ये कां
झडकरी ॥ ६ ॥

  ३०१. आवडेल तसे तुज ओळवीन । वाटे समाधान
जीवा तैसें ॥ १ ॥ नाहीं येथे कांहीं लौकिकाची चाड ।
तुजविण गोड देवराया ॥ २ ॥ पुरवीं मनोरथ अंतरींचे
आर्त । धायेवरी गीत गाई तुझें ॥ ३ ॥ तुका ह्मणे लेंकी
आळवी माहेरा । गाऊं या संसारां तुज तैसें ॥ ४ ॥

  ३०२. तू आह्मां सोयरा सज्जन सांगाती । तुजलागीं
प्रीति चालो सदा ॥ १ ॥ तूं माझा जिव्हाळा जीवाचा
जिवलग ! होसी अंतरंग अंतरींचा ॥ २ ॥ गण गोत मित्र
तू माझे जीवन । अनन्य शरण तुझ्या पायीं ॥ ३ ॥ तुका
ह्मणे सर्वगुणे तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥ ४ ॥

________________________________________

१ स्तुति करीन.