पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७१

आले बाळ । त्याचें जाणावें सकळ ॥ ३ ॥ तुका ह्मणे हरी ।
वाहावे जी काडियेवरी ॥ ४ ॥

  २९६. धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥ १ ॥
धीर नाही माझे पोटीं । झालों वियोगें हिंपुटी ॥ २ ॥ करावे
शीतळ । बहु झाली हळहळ ॥ ३ ॥ तुका ह्मणे डोई ।
कधी ठेवीन हे पायीं ॥ ४ ॥

  २९७. आमुची कृपाळू तू होसी माउली । विठ्ठले
साउली शरणागता ॥ १ ॥ प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ ।
दृष्टि हे निर्मळ अमृताची ॥ २ ॥ भूक तान दुःख वाटों
नेदीं शीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥ ३ ॥ आशा
तृष्णा माया चिंता दवडी दुरी । ठाव आह्मां करीं खेळावया
॥ ४ ॥ तुका ह्मणे लावीं संतांचा सांगात । जेथें न पवे
हात कळिकाळाचा ॥ ५ ॥

  २९८. आला भागासी तो करीं वेवसाव । परी राहो
भाव तुझ्या पायीं ॥ १ ॥ काय चाले तुह्मीं बांधलें दातारा ।
वाहिलिया भारा उसंतितों ॥ २ ॥ शरीर ते करी शरीराचे
धर्म । नको देऊ वर्म चुको मना ॥ ३ ॥ चळण फिरवी
ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥ ४ ॥ इंद्रियें
करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देई पायीं ॥ ५ ॥
तुका ह्मणे नको देऊ काळा हातीं । येतों काकुलत्नी
ह्मणऊनि ॥ ६ ॥ br

  २९९. आमची कां नये तुह्मासी करुणा । किती

_________________________________________

१ हेतु. २ हे दयानिधे तुह्मीं बांधले असल्यामुळे माझे काय
चालते. वाहिलेल्या भाराला मी शेवटास नेत आहें. ३ मृत्यूच्या.