पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७०

नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥ ३ ॥ अंधळ्याचे
श्रम । शिकविल्याचेचि नाम* ॥ ४ ॥ तुका ह्मणे तारा ।
नांवे तंबुऱ्याचे सारा ॥ ५ ॥ br

३४. करुणापर.

  २९२. माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी तान्हें ॥ १ ॥
अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ २ ॥ मायबापाची
उपमा । तुज देऊं मेघश्यामा ॥ ३ ॥ तेही साजेना पाहातां ।
जीवलगा पंढरिनाथा ॥ ४ ॥ माय पाळी संसारीं ।
परलोकीं राहे दूरी ॥ ५ ॥ तैसा नव्हेसी अनंता । काळावरी
तुझी सत्ता ॥ ६ ॥ तुका ह्मणे नारायणा । तुह्मां
बहुत करुणा ॥ ७ ॥

  २९३. घेई घेई माझे वाचे। गोड नाम विठोबाचें ॥ १ ॥
तुह्मी घ्यारे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ २ ॥ तुह्मी
ऐका रे कान | माझ्या विठोबाचे गुण ॥ ३ ॥ मना तेथे
धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥ ४ ॥ तुका ह्मणे जीवा
नको सोडू या केशवा ॥ ५ ॥

  २९४. समर्थाचे बाळ कीविलेवाणे दिसे । तरी कोणा
हांसे जन देवा ॥ १ ॥ अवगुणी जरी झालें तें वोंगळ ।
करावा सांभाळ लागे त्याचा ॥ २ ॥ तुका ह्मणे तैसा मी
एक पतित । परि मुद्रांकित झालो तुझा ॥ ३ ॥

  २९५. वोडविलें अंग। आतां करून घ्यावे सांग ॥ १ ॥
काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजणें ॥ २ ॥ पोटा

__________________________________________

  • (काम). २ दीनवाणे, ३ अर्पण केले. ४ सर्वज्ञ,