| ६९ |
तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ २ ॥ अज्ञानाचे कर्म फळीं
ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥ ३ ॥ अज्ञानाचे
ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥ ४ ॥
तुका ह्मणे जळो ऐसियांचे तोंड । अज्ञानाचे बंड वाढविती ॥ ५ ॥
२८८. ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथे अहंभाव
पाठी लागे ॥ १ ॥ ह्मणोनियां अवघे सांडिले उपाय ।
धरियेले पाय दृढ तुझे ॥ २ ॥ वेदपरायण पंडित वाचक ।
न मिळती एक एकांमधीं ॥ ३ ॥ पाहों गेलों भाव कैसी
आत्मनिष्ठा । तेथे देखे चेष्टा विपरीत ॥ ४ ॥ आपुलिया
नाहीं निवाले जे अंगें । एकी * करती रागें गुरगुरू ॥ ५ ॥
तुका म्हणे मज कोणाचा पांगिला । नको बा विठ्ठला
करूं आतां ॥ ६ ॥
२८९. ठेवा जाणीव गुंडून । येथे भावचि प्रमाण ॥ १ ॥
एका अनुसरल्या काज । अवघे जाणे पंढरिराज ॥ २ ॥
तर्कवितर्कासी । वाव नलगे सायासीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे
भावेंविण । अवघा बोलती तो शीण ॥ ४ ॥
२९०. कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा
॥ १ ॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडी ॥ २ ॥
भुस उपणुनि केले काय । हारपले दोन्ही ठाय ॥ ३ ॥
तुका ह्मणे लागे हातां । काय मथिले घुसळितां ॥ ४ ॥
२९१. गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥ १ ॥
तैसें जाणा ब्रह्मज्ञान । बापुडे ते भक्तीविण ॥ २ ॥ रुची
_________________________________________
- (योगी करती,) २ अंकित. ३ पाखडून,