पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६८

मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥ ४ ॥ तुका ह्मणे
मोल । देऊन घेतला सोमल ॥ ५ ॥

_____
३३ ज्ञान आणि भक्ति.

  २८३. उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि नेणवे अंत
विठोबाचा ॥ १ ॥ उदंड अक्षरां करोत भरोवरी । पारि ते
नेणवे थोरी विठोबाची ॥ २ ॥ तुका ह्मणे नाहीं
भोळेपणाविण । जाणीव ते शीण रितें माप ॥ ३ ॥

  २८४. भक्तिप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां
ज्ञानियांसी ॥ १ ॥ आत्मनिष्ठ जरी झाले जीवन्मुक्त । तरी
भक्तिसुख दुर्लभ त्यां ॥ २ ॥ तुका ह्मणे कृपा करील
नारायण । तरिच हे वर्म पडे ठावें ॥ ३ ॥

  २८५. पंडित तो भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥ १ ॥
अवघे सम ब्रह्म पाहे । सर्वा भूती विठ्ठल आहे ॥ २ ॥
रिता नाहीं कोणी ठाव । सवभूतीं वासुदेव ॥ ३ ॥ तुका
ह्मणे तोचि दास । त्या देखिल्या जाती दोष ॥ ४ ॥

  २८६. मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां
वाटे गोड नाम तुझें ॥ १ ॥ नेणतें लेकरू आवडीचे
तान्हें । बोलतों वचने आवडीनें ॥ २ ॥ भक्ती नेणे काही
वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥ ३ ॥ तुका ह्मणे
नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥ ४ ॥

  २८७. अज्ञानाची भक्ति इच्छिती संपत्ती । तयाचिये
चित्तीं बोध कैंचा ॥ १ ॥ अज्ञानाची पूजा कामिक भावना ।

__________________________________________

१ अदलाबदल २ इच्छेच्या.