पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६६

  २७४. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या
पती सोयरिया ॥ १ ॥ गोड तुझें रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्व काळ ॥ २ ॥ विठोमाउलये हाचि वर
देई । संचरोन राहीं हृदयामाजीं ।। ३ ।। तुका ह्मणे कांहीं
न मागे आणिक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥ ४ ॥

  २७५. नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर
नाहीं देवें ॥ १ ॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल
तैसा बोल रामकृष्ण ॥ २ ॥ देवापाशीं मागे आवडीची
भक्ति । विश्वासेसीं प्रीति भावबळे ॥ ३ ॥ तुका ह्मणे मना
सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥ ४ ॥

  २७६. पाहतां श्रीमुख सुखावलें सुख । डोळियांची
भूक नवजे माझी ॥ १ ॥ जिव्हे गोडी तीन अक्षरांचा
रस । अमृत जयास फिकें पुढे ॥ २ ॥ श्रवणींची वाट
चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥ ३ ॥
महामळे मन होते जे गांदलें । शुद्ध चोखाळलें स्फटिक
जैसें ॥ ४ ॥ तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल
निधान सांपडलें ॥ ५ ॥

  २७७. कस्तुरीचे अंगीं मिनली मृत्तिका । मग वेगळी
कां येईल लेखू ॥ १ ॥ तयापरि भेद नाहीं देवभक्ती ।
संदेहाच्या युक्ति सरों द्याव्या ॥ २ ॥ इंधने ते आगी
संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणे वाहाळ तोंचि ॥ ३ ॥
तुका ह्मणे माझे साक्षीचे वचन । येथे तो कारण
शुद्ध भाव ॥ ४ ॥ br

__________________________________________

१ संचार के न. २ मळलेलें. ३ ठाव. ४ अनुभवाचे.