पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६५

  २७१. जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा
पुतळा ॥ १ ॥ आणीक नये माझ्या मना । हो का पंडित
शाहाणा ॥ २ ॥ नामरूपीं जडले चित्त । त्याचा दास मी
अंकित।। ३ ॥ तुका ह्मणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥ ४ ॥

  २७२. ऐका महिमा आवडीची। बोरें खाय भिलटीची ॥ १ ॥
थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला ॥ २ ॥
अष्टमा सिद्धीला । न मानी क्षीरसागराला ॥ ३ ॥ पोहे सुदाम
देवाचे । फ़के मारी कोरडेच ॥ ४ ॥ न ह्मणे उच्छिष्ट
अथवा थोडे । तुका ह्मणे भक्तीपुढे ॥ ५ ॥

  २७३. नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण
नाना जात ।। १ ।। शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार ।
परिसीं संस्कार सकळ हेम ।। २ ॥ पर्जन्य वर्षतां जीवना
वाहावट । तें समसकट गंगे मिळे ॥ ३ ॥ सर्व तें हे जाय
गंगाचि होऊन । तैसा वर्णावण नाहीं नामीं ॥ ४ ॥ महापुरी
जैसे जातसे उदक । मध्ये ते तारक नाव जैसी ॥ ५ ॥
तये नावेसंगे ब्राह्मण तरती । केवीं ते बुडती अनामिक ॥ ६ ॥
नाना काष्टजात पडतां हुताशनीं । ते जात होउनी एकरूप
॥ ७ ॥ तेथे निवडेना घुर की चंदन । । तैसा वर्णावर्ण
नामीं नाहीं ॥ ८ ॥ पूर्वानुवोळख तेच पै मरण । जरि
पावे जीवन नामामृत ॥ ९ ॥ नामामृते झालें मुळींचे स्मरण ।
सहज साधन तुका ह्मणे ॥ १० ॥

___________________________________________

१-(९) श्रवण, ३ कीर्तन. ३ नामस्मरण, ४ पादसेवन,
५ अर्चन. ६ वेद , ७ दस्यि. ८ सख्या ९ आत्मनिवेदन
अशी नऊ प्रकारची भक्ति आहे. २ महार. ३ अग्नीत