पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६२

  २६६. तरिच जन्मा यावें । दास विठ्ठलाचे व्हावें ॥ १ ॥
नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ २ ॥
जाल्याचे ते फळ । अंगीं लागों नेदी मळ ॥ ३ ।। तुका
ह्मणे भले । ज्याच्या नांवें मानवले ॥ ४ ॥

  २५७. नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास
॥ १ ॥ त्याचे तोंडीं पडे माती । हीन शूकराची जाती ॥ २ ॥
घोकुनी अक्षर । वाद छळणा करीत फिरे ॥ ३ ॥ ह्मणे
देवासी पाषाण । तुका ह्मणे भावहीन ॥ ४ ॥
  २५८. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार । येर मास
पर हाता न कळे ॥ १ ॥ देखावें नेत्रीं बोलावें मुखें ।
चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ २ ॥ परिमळासी घ्राण
ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नये ॥ ३ ॥ एक देहा
भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी ॥ ४ ॥ तुका
ह्मणे ऐशी जयाची सत्ता ! कां तया अनंता विसरलेती ॥ ५ ॥

  २५९. कांहीं न मागती देवा । त्यांची करू धांवे सेवा
॥ १ ॥ हळूहळू फेडी ऋण । होउनियां रूपं दीन ॥ २ ॥
होऊ न शके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥ ३ ॥
तुका ह्मणे भक्तिभाव । हाचि देवाचाही देव ॥ ४ ॥

२६०. पडतां जडभारी । दास आठवावा हुरी ॥ १ ॥
मग तो होऊ नेदी शीण । आड घाली सुदर्शन ॥ २ ॥
नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥ ३ ॥ तुका
म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥ ४ ॥

 २६१. कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो
जनासी एकला तो ॥ १ ॥ बाळा दुध कोण करितें उत्पती ।।