पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




धरिल्या देहाचे सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥ १ ॥
लावीन निशाण जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या ॥ २ ॥
नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडी श्रीहरी पांडुरंग ॥ ३ ॥
भाविक हो येथे धरा रे आवांका । ह्मणे दास तुका शुद्धयाती ॥ ४ ॥