पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५९
३०, श्रद्धा.

  २४३. सोंगे छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥ १ ॥
सारा अवघे गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ २ ॥ शुद्ध
भावाविण । जो जो केला तो तो शीण ॥ ३ ॥ तुका ह्मणे
कळे । परि होताती अंधळे ॥ ४ ॥

  २४४. धन्य शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥ १ ॥
ऐकिलें तेंचि कानीं । होय परिपाक मनीं ॥ ३ ॥ कळवळा
पोटीं । सावघान हितासाठीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे भाव ।।
त्याचा तोचि जाणां देव ॥ ४ ॥

  २४५. पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी
पाय ठेवी ॥ १ ॥ सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं
देव तेचि जाले ॥ २ ॥ उदका भिन्न पालट काई । गंगा
गोड येरां चवी काय नाहीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे हे भाविकांचे
वर्म । येरीं धर्माधर्म विचारावे ॥ ४ ॥

  २४६. कासिया पाषाण पूजिती पितळ । अष्ट धातु
खळ भावाविण*॥ १ ॥ भावाचि कारण भावचि कारण । मोक्षाचे
साधन बोलियेलें ॥ २ ॥ काय करिल जपमाळा कंठमाळा ।
करिशी वेळोवेळां विषयजप ॥ ३ ॥ काय करशील पंडित हे
वाणी । अंक्षराभिमानी थोर होय ॥ ४ ॥ काय करिशील
कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुद्धि ते ॥ ५ ॥ तुका
ह्मणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥ ६ ॥

  २४७. चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काई । स्वहित तें
ठायीं आपणापें ॥ १ ॥ मनाशी विचार तोचि खच भाव ।
व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ २ ॥ शुद्ध मावा न लगे

_________________________________________

  • (भावहीन.)