पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५३

आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥ ३ ॥ मस्तक ठेंगणा ।
करीं संतांच्या चरणा ॥ ४ ॥ वेचीं तें वचन । जेणें राहे
समाधान ॥ ३ ॥ तुका ह्मणे फार । थोडा तरी परउपकार ॥ ६ ॥

  २१८. आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य या नांवें
॥ १ ॥ होणार ते सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धी ॥ २ ॥
सत्य संकल्पाचे साठीं । उजळा पोटीं रविबिंब ॥ ३ ॥
तुका ह्मणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥ ४ ॥

  २१९. आह्मां सोयरे हरिजन । जनीं भाग्य निकंचन
॥ १ ॥ ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग
॥ २ ॥ भुके तान्हे चित्तीं । सदा देव आठविती ॥ ३ ॥
तुका ह्मणे धन । ज्याचें निज नारायण ॥ ४ ॥

  २२०. उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र
कासयानें ॥ १ ॥ उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना ।
विन्मुख चरणां संतांचिया ॥ २ ॥ दुखवी तो बुडे सांगडीचा
तापा । अतित्याई पापाचीच मूर्ति ॥ ३ ॥ तुका ह्यणे जेव्हां
फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥ ४ ॥

  २२१. कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण
देइल धीर माझ्या जीवा ॥ १ ॥ शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी
वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥ २ ॥ कलियुगी बहु

__________________________________________

१ दुस-यांचे गुणदोष ऐकू नकोस आणि त्यांना मनांत ठाव 

देऊ नकोस, २ संतचरणी नम्रता धर. ३ खर्च कर, बोल.
४ उजळलेल्या आकाशाच्या पोटीं ज्याप्रमाणे रविबिंब असते
त्याप्रमाणे शुद्ध हेतूबरोबर पुण्य असतेच. ५ दारिद्य. ६ भुकेले
आणि तहानेले असतांहीं जे देवास निरंतर आठवितात. ७ ज्याने
संतांचा त्याग केला आहे अशा अभग्याला प्रायश्चितानेसुद्धा उद्धार नाहीं.